首页/Detail
中级

马拉地语:中级水平

中级是独立使用阶段:你能读懂关于熟悉话题的真实马拉地语文本的要点。这些课程使用更长的文本和自然的措辞,让你接触人们真实使用的语言。

中级水平你能做到

  • 听懂关于熟悉话题的清晰话语的要点。
  • 描述经历、计划和观点。
  • 阅读通俗易懂的文章和故事。

大约需要2000个单词和约350–400小时的学习才能达到这个水平。

中级的马拉地语课程

科学与科技中级
Dainik Prabhat9月1日

PMC Waste Management: महापालिकेचा मोठा निर्णय! चिंध्या अन् फर्निचर कचऱ्यावर होणार प्रक्रिया; स्थायी समितीत प्रस्ताव दाखल

PMC Waste Management: दररोज ७५ मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प; सण-उत्सवांच्या काळात रस्त्यावर टाकल्या जाणाऱ्या सुक्या कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार.

体育中级
Pudhari9月1日

Sangli Crime : पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीस जन्मठेप

​ईश्वरपूर : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा ओढणीने गळा आवळून निर्घृण खून केल्यानंतर तिचा मृतदेह पत्र्याच्या पेटीत लपवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला जन्मठेप आणि १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. मंगेश चंद्रकांत कांबळे (रा. मांगले, ता. शिराळा) असे शिक्षापात्र आरोपीचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्र. १) देविदास एच. केळूसकर यांनी हा निकाल दिला. या खटल्यात अवघ्या सहा वर्षांच्या मुलाने स्वतःच्या बापाविरोधात दिलेली साक्ष महत्त्वाची ठरली.या खटल्याची पार्श्वभूमी अशी, मंगेश याने प्रेमविवाह केला होता. तो पनवेल येथे डंपरचालक म्हणून कामाला असताना पत्नी प्राजक्ता (वय ३०), मुलगा शिवम (वय ६) आणि मुलगी शिवण्या (वय ३) यांच्यासह राहत होता. मंगेश पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन सतत भांडत असे. २१ मार्च २०२५ रोजी तो कुटुंबासह मांगले येथील मूळ गावी आला. त्यानंतर २७ मार्च २०२५ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास राहत्या घरी त्याने पुन्हा प्राजक्ताशी वाद घातला. मारहाण करत ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली.मुलासमोरच मृतदेह पेटीत ठेवलाखुनानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मंगेशने मृतदेह शेजारच्या खोलीतील लोखंडी पेटीत ठेवला आणि खोलीला कुलूप लावून पसार झाला. हा सर्व प्रकार सहा वर्षांचा मुलगा शिवम प्रत्यक्ष पाहत होता. शिवमने रडत आत्याला सर्व प्रकार सांगितल्यानंतर हत्येचा बनाव उघडकीस आला. मृत प्राजक्ता यांच्या आई रंजना चांदणे यांनी शिराळा पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली होती.शिराळा पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणी दरम्यान सरकारी पक्षातर्फे १६ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी रंजना चांदणे, मुलगा शिवम, पंच, वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक बनसोडे, डॉ. अनिरूद्ध काकडे, तपासी अंमलदार पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.बालविकास अधिकारी स्वाती शिंदे, मावशी वर्षा चांदणे व पोलिसांच्या उपस्थितीत शिवमचा जबाब नोंदवण्यात आला होता. "वडिलांनी आईला मारहाण करून गळा आवळला अन् कपड्याने बांधून मोठ्या डब्यात ठेवले", अशी साक्ष चिमुकल्या शिवमने न्यायालयात दिली. या बालकाची महत्त्वपूर्ण साक्ष या खटल्याचा मुख्य आधार ठरली.न्यायालयाने भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०३(१) व २३८ अन्वये मंगेशला दोषी धरत जन्मठेप व १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. सतीश केकणीस यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शरद जाधव, सुनंदा निकम व पोलिस हवालदार उत्तम शिंदे यांनी सहकार्य केले.

社会中级
Pudhari9月1日

Pandharpur News : पंढरपूर कॉरिडॉरमधील बाधितांच्या घराला घर, दुकानाला दुकान मिळणार

सोलापूर : कॉरिडॉरसाठी पंढरपूर येथे बाधित दुकानदारांना पर्यायी दुकान, बाधित होणाऱ्या ४५० हून अधिक घरांतील नागरिकांना योग्य पर्याय उपलब्ध करून देत नियोजन केले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जागेवर निवासी संकुल उभे केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली. बाधितांसाठी मंदिरापासून सव्वा किलोमीटर अंतरावर एकतीस हजार तीनशे चौरस मीटर इतकी जागा असून, यात २८ हजार चौरस मीटर जागेवर घरे बांधून दिली जाणार आहेत. विशेष म्हणजे बाधितांना घर आणि दुकान बांधून पूर्ण होईपर्यंत तीन वर्षे घर आणि दुकानाचे भाडेदेखील राज्य शासनाच्या माध्यमातून दिले जाणार आहे. त्यासाठी विशेष पुनर्वसन पॅकेजला मान्यता दिल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.पंढरपूरमधील जमीन व मालमत्ता अधिग्रहणासाठी देण्यात येणारा मोबदला हा थेट मुंबईतील दरांच्या धर्तीवर देण्यात आला आहे. पंढरपूरमधील जुनी मंदिरे आणि मठ यांचे धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन त्यांना आहे त्याच ठिकाणी ठेवून त्यांचा विकास केला जाणार आहे. कोणतेही मंदिर किंवा मठ स्थलांतरित केले जाणार नाहीत. बाधितांचे योग्य पुनर्वसन करून जागेस जागा देण्याचे शासनाचे धोरण आहे. विकास आराखड्यामुळे बाधित होणारे दुकानदार, रहिवासी आणि इतर व्यावसायिक यांच्या पुनर्वसनाला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य राहणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

中级21:42

商业与职场

नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करणे

रोहनची मैत्रीण मृणालने तिची स्थिर नोकरी सोडून बेकरी सुरू केली. रोहन आणि स्नेहा नियमित पगारापासून लहान व्यवसायापर्यंतच्या प्रवासाबद्दल बोलतात, आणि हा निर्णय यशस्वी करण्यासाठी खरोखर काय लागते यावर चर्चा करतात.

रोहन देशमुख & स्नेहा जोशी边听边学
中级22:05

教育

ऑनलाइन शिक्षण विरुद्ध पारंपरिक वर्गखोली

रोहन आणि स्नेहा ऑनलाइन शिक्षणाची तुलना प्रत्यक्ष वर्गखोलीत शिकण्याशी करतात. लवचिकता, शिस्त, सामाजिक संपर्क आणि कोणती पद्धत खरोखर चांगल्या प्रकारे शिकायला मदत करते यावर ते चर्चा करतात.

रोहन देशमुख & स्नेहा जोशी边听边学
中级22:39

商业与职场

फ्रीलान्सिंग विरुद्ध पूर्णवेळ नोकरी

रोहनचा मित्र समीर अनेक वर्षांपासून फ्रीलान्सिंग करतोय, तर रोहन नेहमीच पूर्णवेळ नोकरीत होता. ते दोघे स्नेहासोबत फ्रीलान्स कामातील स्वातंत्र्य आणि अनिश्चितता यांची तुलना नियमित पगाराच्या स्थिरतेसोबत करतात.

रोहन देशमुख & स्नेहा जोशी边听边学

按主题学中级的马拉地语

其他马拉地语等级

不确定这是不是你的等级?

做一个简短的分级测试,我们会建议你从哪里开始。

做水平测试

关于中级 马拉地语的常见问题

马拉地语的中级水平是什么?
在Heylangs,中级是描述你马拉地语能力的六个等级之一。读懂真实文本的主要内容。
达到中级需要掌握多少马拉地语单词?
中级的合理目标是约2000个单词。具体数量取决于语言和你选择的单词。先学最常用的。
达到马拉地语 中级需要多久?
对学习难度中等语言的英语母语者来说,总共约需350–400小时的学习。每天短时间、用适合你水平的内容学习,比偶尔长时间学习更有效。