마라티어: 마스터 레벨
마스터은 마라티어의 숙달 단계예요. 거의 모든 것을 이해하고 뉘앙스, 유머, 어투까지 알아차려요. 이 레슨들은 풍부한 관용 표현이 담긴 글로 언어의 가장 섬세한 부분을 다듬어 줘요.
마스터에서 할 수 있는 것
- 읽거나 듣는 거의 모든 것을 이해해요.
- 여러 출처의 정보를 요약해요.
- 미묘한 뉘앙스 차이를 정확하게 표현해요.
이 레벨에 도달하려면 약 16,000개 단어와 대략 1,000–1,200시간의 학습이 필요해요.
마스터 마라티어 레슨
뉴스
9개 모두 보기
영감과 유머마스터Ratnagiri News : चिपळूण न. प.च्या रस्ता रुंदीकरणासाठी हालचाली सुरू
चिपळूण शहर : शहरातील छत्रपती शिवाजी चौक ते बहादूरशेख व छत्रपती शिवाजी चौक ते पाग पॉवर हाऊस (स्वा. सावरकर चौक) रस्ता रूंदीकरणाच्या प्रक्रियेला चिपळूण न.प. प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुसार २ सप्टेंबरपासून प्रस्तावित रूंदीकरणामध्ये ताब्यात घेतल्या जाणार्या जागांचे मोजमाप व मूल्यमापन प्रशासनाकडून सुरू केले जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यासंदर्भात संबंधित जागा मालकांना यापूर्वीच नोटीसांद्वारे सूचीत करण्यात आले आहे.शहरातील प्रमुख वर्दळीच्या रस्त्यांचे रूंदीकरण करण्याबाबत नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी निर्णय घेतला. स्मार्ट सिटीच्या दृष्टीने प्रामुख्याने शहरातील रस्ते रूंद असणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन त्यांनी प्रथम प्रमुख वर्दळीचे रस्ते रूंद करण्यासाठी प्रशासनाकडून परिपूर्ण माहिती व तांत्रिक अहवाल नियोजन तयार करून घेतले. त्यानुसार आवश्यक असणार्या निधीसाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या महत्त्वाच्या विकासकामांचे प्रस्ताव निधीसाठी दिले. त्याला प्राथमिक स्तरावर संबंधितांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने आता प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात केली जाणार आहे.यापूर्वी प्राथमिक स्तरावर रस्ता रूंदीकरणाची मोजमापे घेण्यात आली. त्यानुसार दोनवेळा संबंधित जागा मालकांना या बाबत नोटीसा देऊन कल्पना देण्यात आली व बाधीत जागेसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच संबंधितांनी रस्ता रूंदीकरणासंदर्भात प्रशासन व न.प.कडून कोणत्या अपेक्षा आहेत, अशा आशयाच्या सूचना मागविण्यात आल्या. आता प्रशासनाकडून रूंदीकरणासाठी कार्यवाहीचे पहिले पाऊल उचलले जाणार आहे. त्यानुसार प्रशासनाने छत्रपती शिवाजी चौक ते बहादूरशेख नाका दरम्यानच्या रस्ता रूंदीकरणाला दोन्ही बाजूने आवश्यक जागा रेखांकीत करण्यासाठी संबंधित जागांचे मोजमाप व रेखांकन करण्यास सुरुवात केली जाणार आहे. त्याबाबत संबंधित जागा मालकांना प्रशासनाकडून नोटीसा देऊन सूचीत करण्यात आले आहे.
사회마스터Hirkani Tigress : ‘हिरकणी’ही पडली कोकणच्या प्रेमात
चिपळूण : कोयना अभयारण्यात सोडलेल्या वाघांना कोकणातील निसर्गाची भुरळ पडली आहे. या अभयारण्यात सोडलेली ‘हिरकणी’ तब्बल दोन महिने कोकणातील चिपळूण परिसरात वास्तव्यास होती. अनेकवेळा वन विभागाने तिला पुन्हा कोयना अभयारण्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला. अखेर दोन महिन्यांनंतर ती पुन्हा एकदा आपल्या कोयना अभयारण्याच्या कार्यक्षेत्रात स्थिरावली. त्यासाठी तिला खास प्रयत्न करून वळवावे लागले. त्यामुळे वाघांना कोकणचा निसर्ग आवडल्याचे अधोरेखित झाले आहे.११६५ चौ.कि.मी. परिसरातील सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पसरला आहे. सह्यद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये येतो. त्यामुळे अनेकवेळा व्याघ्र प्रकल्पातील वाघ कोकणामध्ये येत असतात. आंबा घाटमार्गे, तर कधी कुंभार्ली घाटमार्गे त्यांचा कोकणामध्ये प्रवास घडतो. यावेळी तिने याच भागात शिकार केल्याचेही सांगण्यात येत आहे.कोयना अभयारण्यात सोडलेला नर वाघ ‘एसटीआर 03’ अर्थात बाजी याच्या जोडीला ही ‘हिरकणी’देखील कोयना अभयारण्यात सोडण्यात आली. यानंतर या वाघिणीने कोयना अभयारण्यात आपला वावर सुरू केला आणि कालांतराने ही वाघीण पश्चिमेकडे अर्थात सह्याद्री पर्वत ओलांडून थेट कोकणात आली. कोकणात प्रवेश पेंच व्याघ्र प्रकल्पातून पीटीआर १२३ या क्रमांकाची वाघीण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आली. तिला ‘एसटीआर ०६’ हा शासकीय नंबर देण्यात आला, तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कर्मचार्यांनी तिला ‘हिरकणी’ हे नाव दिले. तिने नावाप्रमाणेच सह्याद्रीचा कडा ओलांडून कोकणात प्रवेश केला. तब्बल दोन महिने ती चिपळूण तालुक्याचा पूर्व विभाग पादाक्रांत केला.
일상생활마스터अग्रलेख : उत्सवाचे मांगल्य
पुण्याच्या डेक्कन भागातल्या गुडलक चौकात रविवारी पुणेकर एकत्र आले. हा केवळ काही नागरिकांचा मोर्चा नव्हता, तर तो गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यातील सांस्कृतिक सणांच्या (DJ Banned) नावाखाली चालू असलेल्या आवाजाच्या जाचाविरोधात उमटलेला एक प्रातिनिधिक एल्गार होता.
스토리
320개 모두 보기짧은 강연
320개 모두 보기팟캐스트
10개 모두 보기판타지
प्रत्येक संस्कृतीला महापुराची आठवण का असते?
रोहन आणि स्नेहा विविध असंबद्ध संस्कृतींमध्ये आढळणाऱ्या महापुराच्या कथांचा शोध घेतात. मनू, गिलगामेश आणि नोहापासून ते मेसोअमेरिका आणि ऑस्ट्रेलियातील पुराणकथांपर्यंत, ते भौगोलिक, मानसशास्त्रीय आणि प्रसारवादी स्पष्टीकरणांचा आढावा घेतात.
교육
अपयश हाच एक अभ्यासक्रम
रोहन आणि स्नेहा खऱ्या शिक्षणात अपयशाच्या विरोधाभासी भूमिकेचा शोध घेतात. संज्ञानात्मक संशोधन, वैयक्तिक अनुभव आणि चुकांबद्दलच्या सांस्कृतिक दृष्टिकोनांचा आधार घेत, शिक्षण संस्था अपयशाला शिक्षकाचे सर्वात विश्वसनीय साधन म्हणून वापरण्याऐवजी त्याला शिक्षा का देतात याचा ते आढावा घेतात.
판타지
कल्पनारम्य कथा कुठे संपतात आणि लोकश्रद्धा कुठे सुरू होते
रोहन आणि स्नेहा शोध घेतात की रचलेल्या कल्पनारम्य कथा आणि जिवंत लोकश्रद्धा यांमधील अस्पष्ट सीमा कशी ओळखावी. श्रद्धा, प्रामाणिकपणा आणि सांस्कृतिक अधिकार हे कसे ठरवतात की देवता व आत्म्यांबद्दलची एक कथा मिथक आहे, धर्म आहे की केवळ मनोरंजन.
비디오
50개 모두 보기
마스터1:57Akshay Kumar's Next Marathi Movie on Dada Kondke! - Grazing Goat Pictures
Rajshri Marathi
마스터24:53Kothaligad Fort (Peth Fort) : Best Monsoon Trek Near Karjat | Raigad | #Mohim
JeevanKadamVlogs
마스터19:19[Ep.2] भारताचे Scotland म्हणून नावारूपास आलेल्या SHILLONG ची भटकंती | JKV मराठी ट्रॅव्हल सिरीज
JeevanKadamVlogs
주제별 마라티어 마스터
다른 마라티어 레벨
이 레벨이 맞는지 모르겠나요?
간단한 레벨 테스트를 보면 어디서 시작하면 좋을지 알려 드려요.
레벨 테스트 보기