Tuis/Detail

Inspirasie & humor in Marathi

Inspirasie en humor: stories wat jou opbeur of laat lag. Lees en luister in Marathi op jou vlak, van Beginner tot Meesterskap, met klank, vertaling en vasvrae.

Marathi-lesse oor Inspirasie & humor

Inspirasie & humorHoër-gevorderd
Maharashtra Times1 Sep.

पश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी मोठी अपडेट! आजपासून लोकलचे नवे वेळापत्रक; विरारकरांना लाभ, बोरिवलीकर नाराज, कसे आहे नियोजन?

Western Railway Timetable Change From September 1: दोन सामान्य लोकल आता वातानुकूलित म्हणून धावणार आहे. तर, दोन विरार लोकलचा बोरिवली थांबा काढण्यात आल्याने बोरिवलीकरांमध्ये नाराजी आहे.

Inspirasie & humorBeginner
Pudhari1 Sep.

Satara Crime : हॅलो पोलिस, ‘मी पत्नीचा खून केलाय’

सातारा : चारित्र्याच्या संशयावरून पतीने गाढ झोपेत असलेल्‍या पत्‍नीच्या डोक्‍यात पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास राॅड डोक्‍यात मारून खून केला. या घटनेनंतर मारेकर्‍यानेच पोलिसांना फोन करून खुनाची माहिती दिली आणि त्याला अटक केली.सुनीता प्रदीप चव्‍हाण (वय ३१) असे मृत महिलेचे नाव आहे. पती प्रदीप हणमंत चव्‍हाण (३५, दोघे रा. मंगळवार पेठ, समर्थ मंदिर रोड, सातारा) याला अटक केली आहे. या प्रकरणी मृत सुनीता यांचा भाऊ बंडू पवार (रा. कोरेगाव) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.ही घटना ३१ ऑगस्‍ट रोजी पहाटे ३ वाजता घडली. सुनीता व प्रदीप यांच्यात वारंवार वाद होत होते. त्‍यातून अनेकदा मारहाणीपर्यंतच्या घटना घडल्‍या आहेत. प्रदीप हा ट्रक चालक आहे. त्‍यांना दोन मुली व मुलगा आहे. ३० ऑगस्‍ट रोजीही पती-पत्‍नीत वाद झाला. रात्री उशिरा मुले माडीवर व एक आज्जीकडे झोपी गेले. सुनीता झोपेत असताना संशयित प्रदीप याने रॉड काढला. पत्‍नीच्या डोक्‍यात त्‍याने वर्मी घाव टाकताच रक्‍ताच्या चिळकांड्या उडाल्‍या.

Inspirasie & humorMeesterskap
Pudhari1 Sep.

Ratnagiri News : चिपळूण न. प.च्या रस्ता रुंदीकरणासाठी हालचाली सुरू

चिपळूण शहर : शहरातील छत्रपती शिवाजी चौक ते बहादूरशेख व छत्रपती शिवाजी चौक ते पाग पॉवर हाऊस (स्वा. सावरकर चौक) रस्ता रूंदीकरणाच्या प्रक्रियेला चिपळूण न.प. प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुसार २ सप्टेंबरपासून प्रस्तावित रूंदीकरणामध्ये ताब्यात घेतल्या जाणार्‍या जागांचे मोजमाप व मूल्यमापन प्रशासनाकडून सुरू केले जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यासंदर्भात संबंधित जागा मालकांना यापूर्वीच नोटीसांद्वारे सूचीत करण्यात आले आहे.शहरातील प्रमुख वर्दळीच्या रस्त्यांचे रूंदीकरण करण्याबाबत नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी निर्णय घेतला. स्मार्ट सिटीच्या दृष्टीने प्रामुख्याने शहरातील रस्ते रूंद असणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन त्यांनी प्रथम प्रमुख वर्दळीचे रस्ते रूंद करण्यासाठी प्रशासनाकडून परिपूर्ण माहिती व तांत्रिक अहवाल नियोजन तयार करून घेतले. त्यानुसार आवश्यक असणार्‍या निधीसाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या महत्त्वाच्या विकासकामांचे प्रस्ताव निधीसाठी दिले. त्याला प्राथमिक स्तरावर संबंधितांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने आता प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात केली जाणार आहे.यापूर्वी प्राथमिक स्तरावर रस्ता रूंदीकरणाची मोजमापे घेण्यात आली. त्यानुसार दोनवेळा संबंधित जागा मालकांना या बाबत नोटीसा देऊन कल्पना देण्यात आली व बाधीत जागेसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच संबंधितांनी रस्ता रूंदीकरणासंदर्भात प्रशासन व न.प.कडून कोणत्या अपेक्षा आहेत, अशा आशयाच्या सूचना मागविण्यात आल्या. आता प्रशासनाकडून रूंदीकरणासाठी कार्यवाहीचे पहिले पाऊल उचलले जाणार आहे. त्यानुसार प्रशासनाने छत्रपती शिवाजी चौक ते बहादूरशेख नाका दरम्यानच्या रस्ता रूंदीकरणाला दोन्ही बाजूने आवश्यक जागा रेखांकीत करण्यासाठी संबंधित जागांचे मोजमाप व रेखांकन करण्यास सुरुवात केली जाणार आहे. त्याबाबत संबंधित जागा मालकांना प्रशासनाकडून नोटीसा देऊन सूचीत करण्यात आले आहे.

Podcasts

Sien al 2

Inspirasie & humor in Marathi volgens vlak

Ander Marathi-onderwerpe

Vrae oor Marathi leer met Inspirasie & humor

Hoekom Marathi deur Inspirasie & humor leer?
Inhoud waaroor jy omgee hou jou aandag vas, en dieselfde woorde kom in verskillende lesse terug. Daardie herhaling laat woordeskat vassit.
Watter vlak moet ek vir Inspirasie & humor in Marathi kies?
Kies die vlak waar jy ongeveer nege uit tien woorde verstaan. Elke onderwerp het lesse van Beginner tot Meesterskap, sodat jy maklik kan begin en hoër kan gaan.
Is hierdie Marathi-inhoud gratis?
Ja. Leer is gratis, met klank, vertaling en vasvrae. Premium voeg ekstras by soos onbeperkte oefening en uitvoere.