首頁/Detail
中高級

馬拉地文:中高級程度

喺 中高級,你可以流暢咁閱讀同聆聽多種話題嘅馬拉地文。呢啲課堂包括新聞、意見同較長嘅故事,詞彙足以讓你跟隨論點並表達自己嘅看法。

中高級 程度你可以做到

  • 跟到較長嘅講話同大部分新聞報道。
  • 自然流暢咁參與對話。
  • 閱讀文章同小說而毋須不斷求助。

達到呢個程度大約需要 4,000 個詞語同約 500–600 小時學習。

中高級 嘅馬拉地文課堂

成長中高級
TV9 Marathi9月1日

OBC Morcha : आज मुंबईत ओबीसींचा महामोर्चा धडकणार, लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वाखाली ओबीसींचा एल्गार

OBC Morcha : अंतरवली सराटीत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरु असतानाच आज मुंबईत ओबीसींचा महामोर्चा धडकणार आहे.

成長中高級
Pudhari9月1日

Sangli News : ४९ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची चौकशी वर्षानुवर्षे रखडली

सांगली : कामात अनियमितता, हलगर्जीपणा, विनापरवाना गैरहजेरी, आर्थिक गैरव्यवहार यांसह विविध कारणांमुळे जिल्ह्यातील ४९ ग्रामपंचायत अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. संबंधित प्रकरणांचे प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे चौकशीसाठी पाठविण्यात आले आहेत. मात्र, यातील काही प्रकरणे तब्बल आठ ते नऊ वर्षांपासून प्रलंबित असल्याने चौकशीचा अहवाल आणि त्यानंतर होणारी कारवाई नेमकी कधी होणार, असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणांकडे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष घालून चौकशीला गतीसाठी पाठपुरावा करण्याची मागणी होत आहे.ग्रामपंचायत अधिकारी हा गावच्या प्रशासकीय यंत्रणेतील महत्त्वाचा घटक आहे. गावातील विकास कामांचे नियोजन, ग्रामपंचायतीच्या निधीचा विनियोग, ग्रामसभा, ठरावांची अंमलबजावणी, विविध अहवाल व पत्रव्यवहार, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर असते. पाणीपुरवठा, स्वच्छता, दिवाबत्ती, जन्म-मृत्यू दाखले, विवाह नोंदणी, स्वच्छ भारत मिशन, मनरेगा, १५ वा वित्त आयोग, प्रधानमंत्री आवास योजना, स्मार्ट गाव यांसह विविध योजनांचे कामकाजही त्यांना पाहावे लागते.गावाच्या विकासासाठी काही ग्रामपंचायत अधिकारी जबाबदारीने आणि सक्रियपणे काम करत असताना काही ठिकाणी त्यांच्या कामकाजाबाबत तक्रारींचा पाढा वाढत असल्याचे चित्र आहे. आर्थिक गैरव्यवहार, कामात अनियमितता, कर्तव्यात कसूर, विनापरवाना गैरहजेरी यांसारख्या कारणांमुळे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या विरोधात जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यानुसार ४९ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या चौकशीचे प्रस्ताव विभागीय स्तरावर पाठविण्यात आले आहेत.२०१७ पासूनची प्रकरणे अजूनही प्रलंबितविशेष म्हणजे काही ग्रामपंचायत अधिकाऱ्यांविरुद्ध २०१७ पासूनच विभागीय चौकशीचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. आठ ते नऊ वर्षांचा कालावधी उलटूनही या प्रकरणांतील चौकशी अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त झालेला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणांमध्ये चौकशीची प्रक्रिया नेमकी कोणत्या टप्प्यावर आहे, याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चौकशीचा प्रस्ताव पाठविला, त्यानंतर अहवालाची प्रतीक्षा आणि अहवाल आल्यानंतर कारवाई, या प्रक्रियेला वर्षानुवर्षे लागत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. दोषी असल्यास कारवाई आणि निर्दोष असल्यास संबंधितांना दिलासा, यापैकी कोणताही निर्णय वेळेत होत नसल्याने प्रकरणे प्रलंबित ठेवण्याचा नेमका फायदा काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.'तारीख पे तारीख'चा कारभार कधी थांबणार?ग्रामपंचायत अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रारी आल्यानंतर चौकशीचा प्रस्ताव पाठविणे ही केवळ प्रक्रियेची सुरुवात आहे. त्यानंतर चौकशी पूर्ण होऊन अहवाल प्राप्त होणे आणि त्यावर अंतिम निर्णय होणे आवश्यक आहे. मात्र, अनेक प्रकरणांत प्रस्ताव पाठवून वर्षानुवर्षे उलटूनही अहवालच प्राप्त होत नसल्याने 'चौकशी पूर्ण होणार कधी आणि कारवाई होणार कधी?' असा सवाल आता उपस्थित होत आहे.

健康中高級
Pudhari9月1日

Solapur News : लग्नाळू तरुण छेडणार आंदोलन

सोलापूर : बेरोजगारी, अस्थिर खासगी नोकऱ्या आणि मुलींच्या वाढलेल्या अपेक्षांमुळे तरुणांचे लग्न जुळत नाही. त्यातच विवाह जुळवून देण्याच्या नावाखाली मॅरेज ब्युरो आणि खासगी व्यक्तींकडून प्रचंड लूट होत आहे. याविरोधात लग्नाळू तरुण १० सप्टेंबरला सोलापुरात जिल्हा परिषदेच्या पूनम गेटसमोर शांततेत बसून सरकारचे लक्ष वेधणार आहेत. लग्न योग्य वयात व्हावे, फसवणूक होऊ नये यासाठी शासनाकडे अविवाहित तरुण-तरुणींची अधिकृत नोंद असणे आवश्यक असल्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे.आम्ही लग्नाळू युवक येतोय सोलापूर जिल्हा परिषद समोर.. लग्नाळू तरुणांनो, शांततापूर्ण निषेधासाठी एकत्र या... अशी पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या आंदोलनाचे प्रमुख किसनदेव ननवरे यांनी सांगितले की, मुली आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून सरकारी अथवा स्थिर नोकरी असलेला वर हवा, अशी अपेक्षा केली जात असल्याने बेरोजगार तसेच खासगी नोकरी करणाऱ्या तरुणांना विवाहासाठी मुलगी मिळणे कठीण होत आहे. त्यामुळे लग्न न होण्याच्या समस्येची नेमकी व्याप्ती समोर आणण्यासाठी शासनाकडे अविवाहित तरुण-तरुणींची अधिकृत नोंद असणे आवश्यक असल्याची मागणी ननवरे यांनी केली. विवाह जुळवून देण्याच्या नावाखाली मॅरेज ब्युरो आणि खासगी व्यक्तींकडून अविवाहित तरुणांच्या कुटुंबीयांकडून प्रचंड पैसे उकळत आहेत. याविषयी मागण्यांचे निवेदन पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार प्रणिती शिंदे यांना देेणार आहेत.आंदोलनकर्त्यांच्या मागण्याजिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत सर्व धर्मीय अविवाहित तरुण-तरुणींची ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी सुरू करावीसरकारी विवाह नोंदणी पोर्टल निर्माण करावेविवाह इच्छुक तरुणांना पाच लाखांचे पॅकेज द्यावे

中高級22:29

商業與職場

कामातून होणारा थकवा: बर्नआउट

रोहन त्याच्या नागपूरमधील शिक्षकी काळातील बर्नआउटच्या अनुभवाबद्दल बोलतो, आणि स्नेहा तिच्या पत्रकारितेच्या काळातील कठीण अनुभव शेअर करते. ते दोघे बर्नआउटची लक्षणे आणि कार्यस्थळावर त्यावर काय उपाय करता येतात यावर चर्चा करतात.

रोहन देशमुख & स्नेहा जोशी聽讀學習
中高級22:28

成長

जेव्हा तुमच्या पालकांसोबतचे नाते बदलते

रोहन आणि स्नेहा चर्चा करतात की मोठे होताना पालकांसोबतचे नाते कसे बदलते, आर्थिक आणि करिअरच्या निर्णयांभोवती सीमा ठरवणे, अपराधीपणाची भावना, सांस्कृतिक अपेक्षा आणि पालक म्हातारे झाल्यावर भूमिकांची अदलाबदल याबद्दल.

रोहन देशमुख & स्नेहा जोशी聽讀學習
中高級21:56

奇幻

हॅरी पॉटर आणि जागतिक चाहतावर्गाची निर्मिती

रोहन आणि स्नेहा चर्चा करतात की हॅरी पॉटर कशा प्रकारे अनेक प्रकाशकांनी नाकारलेल्या एका हस्तलिखितापासून इतिहासातील सर्वात मोठ्या चाहतावर्गांपैकी एक बनला, आणि ही घटना आधुनिक चाहता संस्कृतीबद्दल काय दर्शवते.

रोहन देशमुख & स्नेहा जोशी聽讀學習

按主題瀏覽馬拉地文 中高級

其他馬拉地文等級

唔肯定呢個係咪你嘅程度?

做個簡短嘅分級測試,我哋會建議你由邊度開始。

做程度測試

關於 中高級 馬拉地文嘅問題

馬拉地文嘅中高級程度係咩?
喺 Heylangs,中高級係描述你掌握馬拉地文程度嘅六個等級之一。流暢對話。
中高級 需要識幾多個馬拉地文詞語?
中高級 嘅理想目標大約係 4,000 個詞語。數目視乎語言同你揀嘅詞語而定。先學最常用嘅。
要幾耐先達到馬拉地文 中高級?
對於學習難度一般語言嘅英語母語者,總共大約需要 500–600 小時學習。每日短時間學習配合啱你程度嘅內容,比偶爾長時間學習更有效。