मराठी मा यात्रा

यात्रा: भ्रमण, ठाउँ, यातायात र बाटोमा चाहिने वाक्यांश। सुरुवातकर्ता देखि निपुणता सम्मका आफ्नो स्तरमा मराठी पढ्नुहोस् र सुन्नुहोस्, अडियो, अनुवाद र क्विजसहित।

यात्रा सम्बन्धी मराठी पाठ

यात्राउन्नत
Pudhariसेप्टेम्बर १

Bank Holidays | ...तर सप्टेंबरमध्ये बँका तब्बल ११ दिवस राहणार बंद

कोल्हापूर : सप्टेंबर महिन्यात सणांची रेलचेल असतानाच, बँकिंग क्षेत्रातील संभाव्य संपामुळे बँकांचे कामकाज तब्बल ११ दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ने विविध प्रलंबित मागण्यांसाठी संपाचा इशारा दिला असून, हा संप झाल्यास ११ दिवस, तर संप टळल्यास ७ दिवस बँका बंद राहतील, अशी माहिती यूएफबीओचे सुशांत मुळीक यांनी दिली.मंगळवार (दि. १) पासून सुरू होणाऱ्या या महिन्यात ४ रविवार, २ शनिवार आणि सोमवारी (दि. १४ सप्टेंबर) गणेश चतुर्थीची १ अशा ७ अधिकृत सुट्ट्या आहेत. याशिवाय संघटनेने ११ सप्टेंबर तसेच २८, २९ व ३० सप्टेंबर या ४ दिवशी संपाचा इशारा दिला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर वेगवेगळ्या राज्यांतील स्थानिक सुट्ट्या (उदा. गुजरातची जन्माष्टमी, केरळचा ओणम) एकत्र करून सप्टेंबरमध्ये १३ दिवस बॅंका बंद राहतील, असे संदेश व्हायरल झाले आहेत. या अफवा असून त्यावर ग्राहकांनी विश्वास ठेवू नये. महाराष्ट्रात गणेश चतुर्थी वगळता इतर कोणतीही अतिरिक्त सुट्टी नाही.बॅंक कर्मचाऱ्यांच्या मागण्या...बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी हा संपाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये ८ मार्च २०२४ रोजी झालेल्या समझोता करारानुसार पाच दिवसांचा आठवडा त्वरित लागू करावा, शासनाने एकतर्फी व भेदभावपूर्ण पद्धतीने लागू केलेली ‘कामगिरी आधारित प्रोत्साहन’ योजना तत्काळ मागे घेऊन तिच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यावी, कामगार संघटनांशी द्विपक्षीय चर्चा करून या योजनेत आवश्यक सुधारणा करून तसेच वेतन करार व सेवेसंदर्भातील इतर उर्वरित प्रश्न तातडीने निकाली काढाव्यात, या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.

यात्राप्रारम्भिक
Dainik Prabhatसेप्टेम्बर १

Medha Kulkarni: “डीजे, लेझर अन् प्लाझ्मावर बंदी आणावी!”; गणेशोत्सवाबाबत खासदार डॉ. मेधा कुलकर्णींचे मोठे विधान

Medha Kulkarni: पुण्याने महाराष्ट्रासाठी गणेशोत्सवाचा आदर्श 'पुणे पॅटर्न' तयार करावा; खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांचे डीजे व लेझर लाईटविरोधात रोखठोक वक्तव्य.

यात्राउन्नत
TV9 Marathiअगस्ट ३१

मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य

महायुती म्हणून एकत्रित निवडणुका लढण्याला प्राधान्य, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. काही लोक गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत, नाव न घेता प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेला टोला लगावलाय. शिंदेंची शिवसेना मुंबई बँकेच्या निवडणुकीत उतरणार असल्याची बाब समोर येते. विसंवाद कसा होईल ते काही लोकं बघतायत, असंही दरेकर यांनी म्हटलंय. कुठल्याही प्रकारच्या निवडणुका असतील, तर त्या महायुती म्हणून […]

स्तरअनुसार मराठी मा यात्रा

अन्य मराठी विषय

यात्रा मार्फत मराठी सिक्ने बारे प्रश्नहरू

यात्रा मार्फत मराठी किन सिक्ने?
तपाईंलाई मन पर्ने सामग्रीले ध्यान समात्छ, र उही शब्द फरक पाठमा फर्किन्छन्। त्यही दोहोरिनाले शब्दभण्डार मनमा बस्छ।
मराठी मा यात्रा का लागि कुन स्तर छान्ने?
दस शब्दमध्ये करिब नौ बुझिने स्तर छान्नुहोस्। हरेक विषयमा सुरुवातकर्ता देखि निपुणता सम्मका पाठ छन्, त्यसैले सजिलोबाट सुरु गरी माथि जान सकिन्छ।
के यो मराठी सामग्री निःशुल्क छ?
हो। सिक्न निःशुल्क छ, अडियो, अनुवाद र क्विजसहित। Premium ले असीमित अभ्यास र निर्यात जस्ता अतिरिक्त सुविधा थप्छ।