Sport in marathi
Sport: squadre, partite, allenamenti e le parole del gioco. Leggi e ascolta in marathi al tuo livello, da da Principiante a Padronanza, con audio, traduzione e quiz.
Lezioni di marathi su Sport
Notizie
Vedi tutte le 3
SportIntermedioSangli Crime : पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीस जन्मठेप
ईश्वरपूर : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा ओढणीने गळा आवळून निर्घृण खून केल्यानंतर तिचा मृतदेह पत्र्याच्या पेटीत लपवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला जन्मठेप आणि १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. मंगेश चंद्रकांत कांबळे (रा. मांगले, ता. शिराळा) असे शिक्षापात्र आरोपीचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्र. १) देविदास एच. केळूसकर यांनी हा निकाल दिला. या खटल्यात अवघ्या सहा वर्षांच्या मुलाने स्वतःच्या बापाविरोधात दिलेली साक्ष महत्त्वाची ठरली.या खटल्याची पार्श्वभूमी अशी, मंगेश याने प्रेमविवाह केला होता. तो पनवेल येथे डंपरचालक म्हणून कामाला असताना पत्नी प्राजक्ता (वय ३०), मुलगा शिवम (वय ६) आणि मुलगी शिवण्या (वय ३) यांच्यासह राहत होता. मंगेश पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन सतत भांडत असे. २१ मार्च २०२५ रोजी तो कुटुंबासह मांगले येथील मूळ गावी आला. त्यानंतर २७ मार्च २०२५ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास राहत्या घरी त्याने पुन्हा प्राजक्ताशी वाद घातला. मारहाण करत ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली.मुलासमोरच मृतदेह पेटीत ठेवलाखुनानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मंगेशने मृतदेह शेजारच्या खोलीतील लोखंडी पेटीत ठेवला आणि खोलीला कुलूप लावून पसार झाला. हा सर्व प्रकार सहा वर्षांचा मुलगा शिवम प्रत्यक्ष पाहत होता. शिवमने रडत आत्याला सर्व प्रकार सांगितल्यानंतर हत्येचा बनाव उघडकीस आला. मृत प्राजक्ता यांच्या आई रंजना चांदणे यांनी शिराळा पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली होती.शिराळा पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणी दरम्यान सरकारी पक्षातर्फे १६ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी रंजना चांदणे, मुलगा शिवम, पंच, वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक बनसोडे, डॉ. अनिरूद्ध काकडे, तपासी अंमलदार पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.बालविकास अधिकारी स्वाती शिंदे, मावशी वर्षा चांदणे व पोलिसांच्या उपस्थितीत शिवमचा जबाब नोंदवण्यात आला होता. "वडिलांनी आईला मारहाण करून गळा आवळला अन् कपड्याने बांधून मोठ्या डब्यात ठेवले", अशी साक्ष चिमुकल्या शिवमने न्यायालयात दिली. या बालकाची महत्त्वपूर्ण साक्ष या खटल्याचा मुख्य आधार ठरली.न्यायालयाने भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०३(१) व २३८ अन्वये मंगेशला दोषी धरत जन्मठेप व १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. सतीश केकणीस यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शरद जाधव, सुनंदा निकम व पोलिस हवालदार उत्तम शिंदे यांनी सहकार्य केले.
SportPadronanzaPune News: वशिल्याच्या खेळाला बसणार चाप! ५,०१२ सहाय्यक प्राध्यापकांच्या भरतीसाठी नियमावली जाहीर
Pune News: भरती प्रक्रियेत अनियमितता आढळल्यास संस्थाचालक, निवड समिती आणि शासन प्रतिनिधींवर थेट प्रशासकीय व कायदेशीर कारवाईचा इशारा.
30 लाखांपासून केली सुरुवात, आज जवळपास 3 हजार कोटींचं साम्राज्य; तरुणाई ठरली महत्वाचा फॅक्टर
देशातल्या ऑडिओ मार्केटमध्ये आजही हवा करणाऱ्या boAt ची सुरुवात नेमकी कधी झाली? कशी झाली? असा सवाल boAt च्या बहुतेक ग्राहकांना कधी ना कधी नक्कीच पडला असेल. विशेष म्हणजे ऑडिओ बाजार गाजवणाऱ्या boAt चे पहिले उपकरण ईअरबड्स किंवा स्पीकर यापैकी काहीच नव्हते. मग ब्रँडची सुरुवात नेमकी होती तरी काय? जाणून घ्या boAt ची संपूर्ण संघर्ष कथा.
Storie
Vedi tutte le 120Dialoghi
Vedi tutte le 120Brevi discorsi
Vedi tutte le 120Podcast
Vedi tutte le 2Sport
शाळेच्या खेळांच्या संघात सामील होणे
रोहन आणि स्नेहा शाळेतील कबड्डी आणि खो-खो संघात सामील झाल्याच्या आठवणी सांगतात. ते घाबरलेल्या चाचण्या, कठीण हरण्याचे प्रसंग आणि अभिमानास्पद विजयांबद्दल बोलतात. संघकार्य आणि शाळेतील जीवनावर एक सोपी चर्चा.
Sport
कुटुंबासोबत ऑलिम्पिक पाहणे
रोहन आणि स्नेहा कुटुंबासोबत उन्हाळी आणि हिवाळी ऑलिम्पिक पाहण्याच्या त्यांच्या परंपरांबद्दल बोलतात. आवडते खेळाडू, खास क्षण आणि ऑलिम्पिकचा इतिहास यावर एक सोपी आणि मैत्रीपूर्ण चर्चा.
Video
Vedi tutte le 19
Avanzato11:21Full 3 Dhamaal Marathi Movie | Part 06/10 | Priya Berde, Kishori Godbole, Makrand A | Comedy Movie
Rajshri Marathi
Principiante17:52Spicy Misal | Food Review | Misal Pav | Pimpri Chinchwad | Maharashtra Food Tour | Sukirtg
Sukirtg
Elementare15:59Chanderi Fort (चंदेरी किल्ला ) | Maharashtra Forts
JeevanKadamVlogs