હોમ/Detail

મરાઠી માં સમાજ

સમાજ: સમાચાર, સંસ્કૃતિ અને સમુદાયોને ઘડતા મુદ્દાઓ. શરૂઆતી થી પ્રવીણતા સુધીના તમારા સ્તરે મરાઠી માં વાંચો અને સાંભળો, ઑડિયો, અનુવાદ અને ક્વિઝ સાથે.

સમાજ વિશે મરાઠી પાઠ

સમાચાર

બધા 3 જુઓ
સમાજશરૂઆતી
Maharashtra Times1 સપ્ટે

लग्नाच्या 5 महिन्यांतच मोडला संसार, रॅपर बादशाहकडून घटस्फोटाची घोषणा, म्हणाला- प्रत्येक वादळ एक धडा शिकवतं

Rapper Badshah Divorce Post रॅपर बाहशाह याच्या वैवाहिक आयुष्यात गोंधळ सुरू असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर गायकाने यावर मौन सोडले असून घटस्फोट झाल्याचे कबुल केले आहे.

સમાજમધ્યમ
Pudhari1 સપ્ટે

Pandharpur News : पंढरपूर कॉरिडॉरमधील बाधितांच्या घराला घर, दुकानाला दुकान मिळणार

सोलापूर : कॉरिडॉरसाठी पंढरपूर येथे बाधित दुकानदारांना पर्यायी दुकान, बाधित होणाऱ्या ४५० हून अधिक घरांतील नागरिकांना योग्य पर्याय उपलब्ध करून देत नियोजन केले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जागेवर निवासी संकुल उभे केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली. बाधितांसाठी मंदिरापासून सव्वा किलोमीटर अंतरावर एकतीस हजार तीनशे चौरस मीटर इतकी जागा असून, यात २८ हजार चौरस मीटर जागेवर घरे बांधून दिली जाणार आहेत. विशेष म्हणजे बाधितांना घर आणि दुकान बांधून पूर्ण होईपर्यंत तीन वर्षे घर आणि दुकानाचे भाडेदेखील राज्य शासनाच्या माध्यमातून दिले जाणार आहे. त्यासाठी विशेष पुनर्वसन पॅकेजला मान्यता दिल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.पंढरपूरमधील जमीन व मालमत्ता अधिग्रहणासाठी देण्यात येणारा मोबदला हा थेट मुंबईतील दरांच्या धर्तीवर देण्यात आला आहे. पंढरपूरमधील जुनी मंदिरे आणि मठ यांचे धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन त्यांना आहे त्याच ठिकाणी ठेवून त्यांचा विकास केला जाणार आहे. कोणतेही मंदिर किंवा मठ स्थलांतरित केले जाणार नाहीत. बाधितांचे योग्य पुनर्वसन करून जागेस जागा देण्याचे शासनाचे धोरण आहे. विकास आराखड्यामुळे बाधित होणारे दुकानदार, रहिवासी आणि इतर व्यावसायिक यांच्या पुनर्वसनाला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य राहणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

સમાજપ્રવીણતા
Pudhari1 સપ્ટે

Hirkani Tigress : ‘हिरकणी’ही पडली कोकणच्या प्रेमात

चिपळूण : कोयना अभयारण्यात सोडलेल्या वाघांना कोकणातील निसर्गाची भुरळ पडली आहे. या अभयारण्यात सोडलेली ‘हिरकणी’ तब्बल दोन महिने कोकणातील चिपळूण परिसरात वास्तव्यास होती. अनेकवेळा वन विभागाने तिला पुन्हा कोयना अभयारण्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला. अखेर दोन महिन्यांनंतर ती पुन्हा एकदा आपल्या कोयना अभयारण्याच्या कार्यक्षेत्रात स्थिरावली. त्यासाठी तिला खास प्रयत्न करून वळवावे लागले. त्यामुळे वाघांना कोकणचा निसर्ग आवडल्याचे अधोरेखित झाले आहे.११६५ चौ.कि.मी. परिसरातील सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पसरला आहे. सह्यद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये येतो. त्यामुळे अनेकवेळा व्याघ्र प्रकल्पातील वाघ कोकणामध्ये येत असतात. आंबा घाटमार्गे, तर कधी कुंभार्ली घाटमार्गे त्यांचा कोकणामध्ये प्रवास घडतो. यावेळी तिने याच भागात शिकार केल्याचेही सांगण्यात येत आहे.कोयना अभयारण्यात सोडलेला नर वाघ ‘एसटीआर 03’ अर्थात बाजी याच्या जोडीला ही ‘हिरकणी’देखील कोयना अभयारण्यात सोडण्यात आली. यानंतर या वाघिणीने कोयना अभयारण्यात आपला वावर सुरू केला आणि कालांतराने ही वाघीण पश्चिमेकडे अर्थात सह्याद्री पर्वत ओलांडून थेट कोकणात आली. कोकणात प्रवेश पेंच व्याघ्र प्रकल्पातून पीटीआर १२३ या क्रमांकाची वाघीण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आली. तिला ‘एसटीआर ०६’ हा शासकीय नंबर देण्यात आला, तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कर्मचार्‍यांनी तिला ‘हिरकणी’ हे नाव दिले. तिने नावाप्रमाणेच सह्याद्रीचा कडा ओलांडून कोकणात प्रवेश केला. तब्बल दोन महिने ती चिपळूण तालुक्याचा पूर्व विभाग पादाक्रांत केला.

સ્તર મુજબ મરાઠી માં સમાજ

બીજા મરાઠી વિષયો

સમાજ સાથે મરાઠી શીખવા વિશે પ્રશ્નો

સમાજ દ્વારા મરાઠી શા માટે શીખવું?
જે સામગ્રીની તમને પરવા હોય તે તમારું ધ્યાન જકડી રાખે છે, અને એ જ શબ્દો જુદા જુદા પાઠમાં પાછા આવે છે. એ પુનરાવર્તન જ શબ્દભંડોળને યાદ રાખે છે.
મરાઠી માં સમાજ માટે મારે કયું સ્તર પસંદ કરવું?
એવું સ્તર પસંદ કરો જ્યાં તમને દસમાંથી લગભગ નવ શબ્દો સમજાય. દરેક વિષયમાં શરૂઆતી થી પ્રવીણતા સુધીના પાઠ છે, એટલે તમે સરળથી શરૂ કરીને આગળ વધી શકો.
શું આ મરાઠી સામગ્રી ફ્રી છે?
હા. શીખવું ફ્રી છે, ઑડિયો, અનુવાદ અને ક્વિઝ સાથે. Premium અમર્યાદિત પ્રેક્ટિસ અને એક્સપોર્ટ જેવા વધારા ઉમેરે છે.