መነሻ/Detail

መነሳሳትና ቀልድ በማራቲ

መነሳሳትና ቀልድ፦ የሚያነሳሱዎት ወይም የሚያስቁዎት ታሪኮች። በደረጃዎ ከከጀማሪ እስከ ብቃት በማራቲ ያንብቡና ያዳምጡ፣ ከድምጽ፣ ከትርጉምና ከጥያቄዎች ጋር።

ስለ መነሳሳትና ቀልድ የማራቲ ትምህርቶች

መነሳሳትና ቀልድከፍተኛ መካከለኛ
Maharashtra Timesሴፕቴ 1

पश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी मोठी अपडेट! आजपासून लोकलचे नवे वेळापत्रक; विरारकरांना लाभ, बोरिवलीकर नाराज, कसे आहे नियोजन?

Western Railway Timetable Change From September 1: दोन सामान्य लोकल आता वातानुकूलित म्हणून धावणार आहे. तर, दोन विरार लोकलचा बोरिवली थांबा काढण्यात आल्याने बोरिवलीकरांमध्ये नाराजी आहे.

መነሳሳትና ቀልድጀማሪ
Pudhariሴፕቴ 1

Satara Crime : हॅलो पोलिस, ‘मी पत्नीचा खून केलाय’

सातारा : चारित्र्याच्या संशयावरून पतीने गाढ झोपेत असलेल्‍या पत्‍नीच्या डोक्‍यात पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास राॅड डोक्‍यात मारून खून केला. या घटनेनंतर मारेकर्‍यानेच पोलिसांना फोन करून खुनाची माहिती दिली आणि त्याला अटक केली.सुनीता प्रदीप चव्‍हाण (वय ३१) असे मृत महिलेचे नाव आहे. पती प्रदीप हणमंत चव्‍हाण (३५, दोघे रा. मंगळवार पेठ, समर्थ मंदिर रोड, सातारा) याला अटक केली आहे. या प्रकरणी मृत सुनीता यांचा भाऊ बंडू पवार (रा. कोरेगाव) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.ही घटना ३१ ऑगस्‍ट रोजी पहाटे ३ वाजता घडली. सुनीता व प्रदीप यांच्यात वारंवार वाद होत होते. त्‍यातून अनेकदा मारहाणीपर्यंतच्या घटना घडल्‍या आहेत. प्रदीप हा ट्रक चालक आहे. त्‍यांना दोन मुली व मुलगा आहे. ३० ऑगस्‍ट रोजीही पती-पत्‍नीत वाद झाला. रात्री उशिरा मुले माडीवर व एक आज्जीकडे झोपी गेले. सुनीता झोपेत असताना संशयित प्रदीप याने रॉड काढला. पत्‍नीच्या डोक्‍यात त्‍याने वर्मी घाव टाकताच रक्‍ताच्या चिळकांड्या उडाल्‍या.

መነሳሳትና ቀልድብቃት
Pudhariሴፕቴ 1

Ratnagiri News : चिपळूण न. प.च्या रस्ता रुंदीकरणासाठी हालचाली सुरू

चिपळूण शहर : शहरातील छत्रपती शिवाजी चौक ते बहादूरशेख व छत्रपती शिवाजी चौक ते पाग पॉवर हाऊस (स्वा. सावरकर चौक) रस्ता रूंदीकरणाच्या प्रक्रियेला चिपळूण न.प. प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुसार २ सप्टेंबरपासून प्रस्तावित रूंदीकरणामध्ये ताब्यात घेतल्या जाणार्‍या जागांचे मोजमाप व मूल्यमापन प्रशासनाकडून सुरू केले जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यासंदर्भात संबंधित जागा मालकांना यापूर्वीच नोटीसांद्वारे सूचीत करण्यात आले आहे.शहरातील प्रमुख वर्दळीच्या रस्त्यांचे रूंदीकरण करण्याबाबत नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी निर्णय घेतला. स्मार्ट सिटीच्या दृष्टीने प्रामुख्याने शहरातील रस्ते रूंद असणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन त्यांनी प्रथम प्रमुख वर्दळीचे रस्ते रूंद करण्यासाठी प्रशासनाकडून परिपूर्ण माहिती व तांत्रिक अहवाल नियोजन तयार करून घेतले. त्यानुसार आवश्यक असणार्‍या निधीसाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या महत्त्वाच्या विकासकामांचे प्रस्ताव निधीसाठी दिले. त्याला प्राथमिक स्तरावर संबंधितांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने आता प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात केली जाणार आहे.यापूर्वी प्राथमिक स्तरावर रस्ता रूंदीकरणाची मोजमापे घेण्यात आली. त्यानुसार दोनवेळा संबंधित जागा मालकांना या बाबत नोटीसा देऊन कल्पना देण्यात आली व बाधीत जागेसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच संबंधितांनी रस्ता रूंदीकरणासंदर्भात प्रशासन व न.प.कडून कोणत्या अपेक्षा आहेत, अशा आशयाच्या सूचना मागविण्यात आल्या. आता प्रशासनाकडून रूंदीकरणासाठी कार्यवाहीचे पहिले पाऊल उचलले जाणार आहे. त्यानुसार प्रशासनाने छत्रपती शिवाजी चौक ते बहादूरशेख नाका दरम्यानच्या रस्ता रूंदीकरणाला दोन्ही बाजूने आवश्यक जागा रेखांकीत करण्यासाठी संबंधित जागांचे मोजमाप व रेखांकन करण्यास सुरुवात केली जाणार आहे. त्याबाबत संबंधित जागा मालकांना प्रशासनाकडून नोटीसा देऊन सूचीत करण्यात आले आहे.

የመጀመሪያ ደረጃ16:30

መነሳሳትና ቀልድ

आपण का हसतो? जगभरातील विनोद

रोहन आणि स्नेहा जगभरातील विनोदाबद्दल बोलतात. ते भारतीय, जपानी आणि इतर संस्कृतींमधील विनोदाचा अभ्यास करतात. आश्चर्य, वेळ आणि शारीरिक विनोद लोकांना एकत्र जोडतात हे ते शोधतात.

रोहन देशमुख & स्नेहा जोशीያዳምጡና ይማሩ
የመጀመሪያ ደረጃ17:35

መነሳሳትና ቀልድ

हजार 'नाही' ते जागतिक यशापर्यंत

रोहन आणि स्नेहा हार्लंड सँडर्स यांची खरी कथा सांगतात. पंचेसष्टाव्या वर्षी त्यांचे रेस्टॉरंट बंद झाले, पण त्यांनी हार मानली नाही. हजारो वेळा नकार मिळूनही त्यांनी एक मोठा व्यवसाय उभा केला. पुन्हा सुरुवात करायला कधीच उशीर होत नाही, हे या कथेतून समजते.

रोहन देशमुख & स्नेहा जोशीያዳምጡና ይማሩ

መነሳሳትና ቀልድ በማራቲ በደረጃ

ሌሎች የማራቲ ርዕሶች

ማራቲ ን በመነሳሳትና ቀልድ ስለመማር ጥያቄዎች

ማራቲ ን በመነሳሳትና ቀልድ ለምን መማር?
የሚወዱት ይዘት ትኩረትዎን ይይዛል፤ ተመሳሳዮቹ ቃላትም በተለያዩ ትምህርቶች ውስጥ ይመለሳሉ። ቃላት እንዲቀሩ የሚያደርገው ያ መደጋገም ነው።
ለመነሳሳትና ቀልድ በማራቲ የትኛውን ደረጃ ልምረጥ?
ከአሥር ቃላት ወደ ዘጠኙን የሚረዱበትን ደረጃ ይምረጡ። እያንዳንዱ ርዕስ ከከጀማሪ እስከ ብቃት ትምህርቶች አሉት፤ ስለዚህ ከቀላሉ ጀምረው ወደ ላይ መሄድ ይችላሉ።
ይህ የማራቲ ይዘት ነጻ ነው?
አዎ። መማር ነጻ ነው፣ ከድምጽ፣ ከትርጉምና ከጥያቄዎች ጋር። Premium እንደ ያልተገደበ ልምምድና ማውጫዎች ያሉ ተጨማሪዎችን ይጨምራል።